खुप दिवसानी मी परत मराठी पुस्तक वाचनाकडे वळलो. परवा "क्रासवर्ड" मध्ये गेलो होतो. तेव्हा अचानक वपुंच्या पुस्तकावर नजर पडली, "रंगपंचमी", माझ्या वाचनात हे पुस्तक कधी आलेच नव्हते. नवीन वर्षाची सुरुवात वपुंनी करायची असे ठरवुन ते विकत घेतले सुद्धा. घरी आल्यावर मात्र बूक रीडिंग करायचा उत्साह गेला, मागील २-३ दिवस झाले काम आणि वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमध्ये खुप जास्त गुरपटलो होतो. पण मग काल रात्री ठरवुन पुस्तक वाचायला घेतले. पहिली ५० पाने कधी संपली ते कळलेच नाही. या पुस्तका बद्दल आणी त्यात लिहिल्या लहान-मोठ्या गोष्टीं बद्दल लिहीनच, पण थोड्क्यात त्या पुस्तकाबद्द्ल वपु काय म्ह्नणतात ते त्यांच्याच शब्दात सांगतो
"रंगपंचमी साजरी होते ती त्यातील माणसांच्या उत्साही सहभागामुळे, विविध रंगांच्या उधळणीमुळे.
आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे आपल्याला सामील होतात.
आपल्या आयुष्याला बहरायला, फुलायला, रंगबेरंगी करायलाही माणसेच हातभार लावतात; प्रत्येकाचे रंग निराळे,मग हे रंग कधी शहाणपणाचे असतात, कधी वेडेपणाचे,कधी उत्साहाचे; तर कधी नैराश्याचे. त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या-छोट्या प्रसंगानी सजलेली ही 'रंगपंचमी'
कुठेतरी 'आपल्याही आयुष्यात असं घडलं होतं बरं का' असं म्हणायला लावते.
हसवते, खिन्नता आणते, विचारही करायला लावते."
अजुन बरेच काही लिहिन या पुस्तका बदद्ल, आज इथेच थांबतो.......
No comments:
Post a Comment