Saturday, February 18, 2012

आयुष्य

आयुष्य जगण्यात मजा आहे, 
रोज नवीन आव्हाने झेलण्यात पण वेगळीच मजा आहे.

आज येथे तर उद्या कोठे,
या प्रश्नाचे उत्तर शोधत फिरण्यात पण वेगळीच मजा आहे.

आव्हानांचा सामना करताना नवीन आव्हाने उभी राहतात,
पण आयुष्याची वाट नागमोडी चालण्यातच खरी मजा आहे.

या वाटेवर कुणी साथ देतात, 
कुणी मध्येच सोडून जातात, 
तरी ही वाट चालण्यातच, आयुष्याची खरी मजा आहे. 

ना तुझ्या पुढे, ना तुझ्या मागे,
सखे तुझ्या सोबतीने चालण्यातच, या आयुष्य जगण्याची खरी मजा आहे!!!

मनोदीप ...

Monday, February 13, 2012

To my love




नव क्षितिजाची नवी आव्हाने,
पार कराया, हवी साथ तुझी !!

या क्षितिजा वरून त्या क्षितिजावर
राज्य कराया, हवी साथ तुझी !!

तुझ्या प्रीतीची, तुझ्या सोबतीची,
जग जिंकाया, हवी साथ तुझी !!

तुझ्यावीन सखे नको साम्राज्य,
आयुष्य जगाया, हवी साथ तुझी !!!

- Manodeep

Happy Valentine Day Dearo!!! 

I was recollecting the memories of our first valentine day together and the onging transitions in life.... These words came in mind and couldn't resist to write them down. I could never imagine how my life would be without you. You have made it lovely. The words of these small poem are dedicated to you my dear.