Saturday, February 18, 2012

आयुष्य

आयुष्य जगण्यात मजा आहे, 
रोज नवीन आव्हाने झेलण्यात पण वेगळीच मजा आहे.

आज येथे तर उद्या कोठे,
या प्रश्नाचे उत्तर शोधत फिरण्यात पण वेगळीच मजा आहे.

आव्हानांचा सामना करताना नवीन आव्हाने उभी राहतात,
पण आयुष्याची वाट नागमोडी चालण्यातच खरी मजा आहे.

या वाटेवर कुणी साथ देतात, 
कुणी मध्येच सोडून जातात, 
तरी ही वाट चालण्यातच, आयुष्याची खरी मजा आहे. 

ना तुझ्या पुढे, ना तुझ्या मागे,
सखे तुझ्या सोबतीने चालण्यातच, या आयुष्य जगण्याची खरी मजा आहे!!!

मनोदीप ...

No comments: